माझी सगळ्यात ठळक आठवण आहे मी पाच वर्षाचा असतानाची. मला शाळा मुळीच आवडायची नाही. एकतर माझ्या घराच्या आजूबाजूला मला बरेच मजेदार मित्र-मैत्रिणी होत्या. आणि मला काही दिवसातच लक्षात आले की त्यांच्या शाळा माझ्या शाळेपेक्षा लवकर सुटतात. मी लवकर जातो आणि ऊशीरा घरी येतो. मी दूरच्या शाळेत जातो. या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनाला फ़ारच त्रास होऊ लागला. आणि एक दिवस मला आमचा खेळ मधेच सोडून शाळेत जावे लागले.
मला न्यायला त्यावेळी सायकल रिक्षा यायचा. घरापासून निघाल्यावर जवळ जवळ एक किलोमीटर चढाव होता. त्यामुळे रिक्षावाला रिक्षा हळूहळू पायी ओढायचा. त्या दिवशी, मी रिक्षातून ऊडी मारली आणि पळत पळत घरी आलो. त्या दिवशी अर्थातच सुटि मिळली.
माझ्या शाळेचे नाव होते माऊंट कारमेल कॉन्व्हेंट.
No comments:
Post a Comment