Monday, October 6, 2008

एका कॅंपची गोष्ट

आता हेच बघाना, आमची मुलगी ५ दिवसांच्या कॅंप ला गेली होती. तिच्या आईला वाईट वाटले - जणु काही ती वर्षभर दूर गेली होती. तर मला असे वाटले की छान मजा करून येईल ४-५ दिवस.आणि मुलीच्या स्वभावाप्रमणे ती नक्कीच मजा करून येईल.पण आईचे हृदय - ते आपल्या मुलांची काळजी नेहमीच करणार.
आईला इथे झोप नाही. मुलगी असेल तर तिच्यावर थोड्या-थोड्या वेळानी ओरडणार, नसेल तर तिची काळजी करणार.
आणि मुलगी ? तिला काय वाटले ? सुटले मी काही दिवस या आरड्याओरड्यातून. पण हे दोन दिवस. पुढे तोच आईचा ओरडा गोड वाटायला लागला.
बर, परत आल्यावर काय ? तर दोन मिनिटे दोघींनी मिठी मारली. पुढे आईचे रागावणे सुरू.
मुलगी पण त्याच चुका पुन्हा तशीच करते आहे.
कॅंपमधे मुलीचा दिवसभराचा कार्यक्रम आईशिवाय अत्यंत नीट प्रकारे सुरू होता असे कळले. मग तो आरडाओरडा कशाला ?
बर, मुलीने तरी आईने ओरडण्याची वाट कशाला पाहावी? गेले पाच दिवस स्वत:हून स्वत:चे काम केले ना ? मग आता
घरी आल्यावर त्यात बदल का झाला ?
आता झाले असे आहे की मुलीलाला माहिती आहे की काही जरी ती विसरली तरी आई आहेच, आणि आईला खात्री आहे की आपली मुलगी विसरणारच!