माझी पहिली आठवण आहे ती माझ्या आत्याबरोबर तिच्या (आणि माझ्याही) शाळेत जायची. मी तेव्हा बालकमंदिरात होतो.
शाळेचं नाव होतं परांजपे कॉन्व्हेंट.
माझी आत्या तिथे शिक्षिका होती. आम्ही आत्याच्याच घरात (बळवंताश्रम) भाड्यानी राहत होतो. मला मधेच वर्गात बसायचा कंटाळा आला की मी तिच्या वर्गात जायचो. मला स्पष्ट आठवतं की सगळ्या मुलांना (बहुतेक दुसरीतली असावीत) या गोष्टीचा अत्यंत हेवा वाटायचा. मी तेव्हा चार वर्षाचा असावा.
मला आठवतं की माझा एक कोरडे नावाचा फ़ार चांगला मित्र होता. आम्ही नेहमी बरोबर खेळायचो. मी एकदा त्याला झोपळ्यावरून पाडले. त्यानंतर आमची मैत्री संपली.
एकूण माझ्या लहानपणच्या आठवणी फ़ारच चांगल्या आहेत. मला काही वाईट अनुभव आठवत नाहीत. माझ्या सर्व अनुभव, आठवणी सगळ्या आनंदाच्या आणि मजेच्याच आहेत.
मला असं नेहमी वाटतं, माझ्या मुलींना मोठं झाल्यावर असंच वाटेल का ?
मला असं नेहमी वाटतं की आपल्या मुलांचं आयुष्य आपल्य़ापेक्षा चांगलं जावं. आणि माझ्य़ा आई-वडिलांनी ते तसं केलं.
No comments:
Post a Comment