संस्कार ? शिक्षण ? पैसे ?
नाही. यातील काहिही नाही. आपण देऊ शकतो त्या केवळ आठवणी.
तुम्ही विचार करा. मोठे झाल्यावर तुम्हाला लहान्पणचे काय आठवते ? काय जाणवते ?
आपल्याजवळ आहेत त्या केवळ आठवणी. आपल्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी आपल्याबरोबर घालवलेल्या काही क्षणांचे अनुभव.
तुम्हाला काय आठवते ? तुमच्या बाबांनी रागावलेले - घरात आल्यावर तुम्ही हात-पाय धुतले नाहीत म्हणून ?
तुम्हाला काय वाटले तेव्हा? मी हात-पाय धुणारच होतो, जरा ही ईथे काय मजा आहे ती पाहू तर द्या.
आता तुम्ही तुमच्या मुलांना ती बाहेरून आल्यावर काय आणि कसे सांगता?
तुम्ही हा विचार करता का - की मी आता काय म्हणायला पाहिजे म्हणजे माझ्या मुलाच्या मनात माझ्याविषयी एक चांगली आठवण राहील ?
हा हा हा !
एव्हढा विचार करंत राहीलो तर ही रागवायची सुवर्ण(!)संधी हातातून जायची!
मला असं वाटतं की मुलांना चांगल्या वागणुकीचे कारण समजावून सांगितले तर ते जास्तं नीट लक्षात राह्ते.
माझ्या काही प्रिय आठवणी अत्यंत साध्या आहेत. कोणी कधी पाठीवरून फ़िरवलेला हात, कोणी कधी मला दिलेले थोडे जास्त आईस्क्रिम वगैरे.
या आठवणी आपल्या मनात अत्यंत ताज्या असंतात. पण त्याचवेळी आपल्या वडिलांनी समोर बसवून एक तास केलेला सदुपदेश दुसर्याच मिनीटाला विसरलेला असतो.
No comments:
Post a Comment