यात वाईट ते काय ? हे तर गेल्या एक वर्षापासून दिसत होत.
गैरसमज करून घेऊ नका. मला अनिल कुंबळे बद्दल अत्यंत आदर आहे आणि त्याच्या खेळावर प्रेमही.
मी कुंबळे गोलंदाजी करतो म्हणून रात्र जागून क्रिकेट मॅच पाहिली आहे.
कुंबळेच्या गोलंदाजी आणि इतरांच्या गोलंदाजीमधे फरक आहे तो अचूकतेचा. त्याच्या शेवटच्या कसॉटीमधल्या गोलंदाजीचे प्रुथ:करण पाहिल्यास कळेल की त्याने
सर्व इतर गोलंदाजांपेक्षा कमी धावा दिल्या आहेत. पण तरीदेखील भारताच्या संघाला आवश्यकता आहे ती एका बळी घेणार्या गोलंदाजाची. नुसत्या धावा थांबवणार्या नव्हे.
तो इतके दिवस सन्घामधे होता कारण इतर गोलंदाज त्याच्या इतके अचूक नव्हते.
पण त्याचे हे सगळे गुण जरी मानले तरी असे दिसत होते की आता त्याला बळी मिळत नाहीत. शिवाय त्याची शारीरिक तंदुरुस्ती दिवसेन दिवस कमीच होत होती.
आणि त्यामुळे कुंबळे रिटायर झाला हे बरे झाले.